आधारकार्ड अपडेटींगसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
यूआयडीएआयने आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध असतील, हे स्पष्ट करून यूआयडीएआयने कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.
यासंदर्भात, आधार कार्ड जारी करणार्‍या यूआयडीएआय संस्थेने व्टिटरद्वारे दिली आहे. या व्टिटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही वापरत असलेली कागदपत्रे तुमच्या नावावर आहेत आणि वैध आहेत, याची खात्री करा.
यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, आधार कार्डमध्ये ओळखीच्या पुराव्यासाठी 32 कागदपत्रे, नातेवाईकांच्या पुराव्यासाठी14 कागदपत्रे, जन्म तारखेच्या पुराव्यासाठी 15 तर पत्त्याच्या पुराव्यासाठी 45 कागदपत्रे स्वीकारली जातात.

Exit mobile version