| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशमधून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव अभिषेक भारद्वाज असून, तो कांगडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अभिषेकवर निगराणी ठेवून होते. बुधवारी कांगडामधून अभिषेकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतले. अभिषेकने कॉलेज सोडले आहे. पोलिसांनी अभिषेककडून पोलिसांनी फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये पोलिसांना संवेदनशील माहिती सापडली आहे.