| बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालयातील दहावी 1992 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिवेआगर येथील श्रीमत् रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं .निलिमा दिवेकर व रविंद्र मोरे यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वागत गीत गाऊन स्नेहसंमेलनाची सुरवात केली.
आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई,चिपळूण,पनवेल,अलिबाग,रोहा अशा ठिकाणी राहणारे 28 मित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहीले.32 वर्षांच्या कालावधीत प्रत्येकाच्या दिसण्यात खूप बदल झाला होता. मात्र आप आपली ओळख पटल्यानंतर जुन्या आठवणीत रमताना शाळेतील गमती जमती,शिक्षक-शिक्षिकांच्या विविध आठवणी, खाल्लेला मार,केलेला खोडकरपणा आठवताना प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या स्नेहमिलनाचे आयोजन कमलेश शहा, वैशाली तोंडलेकर, संतोष पाटील, ज्योती परकर यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले. तब्बल 32 वर्षांनी ऋणानुबंधाच्या जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्याने तयार झालेल्या अविस्मरणीय आठवणींचा ठेवा सर्वांच्या एकत्र छायाचित्रासह आपल्या हृदयात साठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम एकमेकांच्या संपर्कात राहून पुन्हा भेटण्याचा निश्चय करुन एकमेकांचा निरोप घेतला.