महानकरांचा पाणीप्रश्‍न मिटणार

आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून बोरवेलचे भूमीपूजन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महान गावात असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची बोअरवेल मंजूर करून देण्यात आली. त्याचे भूमीपूजन करण्यात आले. यामुळे महानकरांना भेडसावणारा पाणीप्रश्‍न कायमचा मिटणार आहे.

याप्रसंगी वेळी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, जिल्हा परिषद सदस्य मधू पारधी, प्रकाश बसुदे, मोहन धुमाळ, मधू ढेबे, महेश झावरे, गणेश कानोजे, रामराज ग्रामपंचायत सदस्य कीर्ती कनोजे, माजी उपसरपंच वसंत कांबळे, नंदकुमार चिखले, नरेश भांडविलकर, अनुराज चिखले, अनिकेत चिखले, सर्वेश रसाळ, राजू धनावडे, संकेत धनावडे, ऋषी धनावडे, केतन धनावडे, दीपक पाटील, ऋतिक करंजे, रोहन कांबळे, केशव खंडागळे, अनिल पवार, नितेश पोंडके, अपेश पारधी, बोरघर ग्रामपंचायत पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष अक्षय डिकले, महान आणि महानवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version