महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण दुर्घटना

 राजकीय आरोप,प्रत्यारोपांच्या फैर्‍या

पनवेल | प्रतिनिधी |

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी देण्यात आलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.या दुर्घटनेवरुन आता  विरोधकांनी सत्ताधार्‍यांना लक्ष्य करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीेने करण्यात आले,असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.तर राजकीय स्वार्थासाठी एवढी लोक बोलावली जातात का,असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झालेल्या दुर्घटनेबाबत तीव्र शोक प्रकट व्यक्त केला आहे.
अमित शाहना वेदना
अमित शाह यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.  मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे  यांनी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेटही घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारकडून  हा प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे   म्हणाले. तसेच, राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे.  सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी या गोष्टी करण्याची गरज नव्हती. सध्या सगळीकडेच उन्हानं वातावरण तापलेलं आहे. अशावेळी एवढ्या लोकांना सकाळी बोलवायचं, हे टाळता आलं असतं. आप्पासाहेबांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हा कार्यक्रम राजभवनावर बोलवून करता आला असता. एवढ्या लोकांना बोलवून हा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नव्हती. पण झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. याप्रकरणी कसं काय कोण कोणाला जबाबदार धरणार ते कळत नाही. सकाळी न करता संध्याकाळी झाला असता कार्यक्रम तर हा प्रसंग टाळता आला असता.

Exit mobile version