माहेश्‍वरी समाज रक्तदान शिबीर

। कर्जत । प्रतिनिधी ।

कर्जत माहेश्‍वरी समाज व श्री शनी महाराज देवस्थान समिती आयोजित समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात 67 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले कर्जत खालापूर तालुक्यातील 496 वे रक्तदान शिबिर ठरले.

यावेळी योगेश राठी, संदेश भुतोडा, लालसिंह राजपुरोहित, गणेश डागा, राम राठी, पुष्पा चांडक, विमल डागा, अमित चांडक, मनेश सारडा, पुष्पा भुतोडा, डॉ. प्रशांत सदावर्ते, अ‍ॅड. योगेश देशमुख, चंद्रकांत डागा, मयूर डागा, हृषिकेश डागा, लखन राठी, शुभम पांडे, मितेश डागा, मीना प्रभावळकर, आमिर मणियार, महेंद्र कांबळे, विकास चित्ते, कैलाश पोटे, मजीद नेर्लेकर, पंडित मिश्रा, लालजी आदी उपस्थित होते.

Exit mobile version