वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा

| तळा | वार्ताहर |

तळा तालुका डोंगराळ दुर्गम असून निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या डोंगर कपारीत माथ्यावर शेतकरी पावसाळी भातशेती करून गुजराण करुन आपले जीवन जगत आहेत. पावसावर अवलंबून असलेली भात, वरी, नाचणी हि पिके मोठ्या कष्टांनी केली जातात. शेती हा एकमेव व्यवसाय राहीला आहे आणि तोही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. उत्पन्नाचे इतर साधनं नसल्याने गाव ओसाड पडली आहेत. काहींनी जमीनी विकून उदरनिर्वाहसाठी शहरात स्थाईक झाले आहेत असे भकास विदारक चित्र पहायला मिळत आहे. काही शेतकरी बांधव शेती, आंबा, बागायती, भाजीपाला शेतात करुन उपजीविका करीत आहेत त्यात वन्य माकड, डुक्कर पिकांची नासाडी करीत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिली आहे. याचा त्रास शहरात देखील वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई देखील दिली जात नसून प्रशासनाने या वन्य प्रांण्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटना तळा शाखेच्या वतीने केली जात आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला गेला नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी दिला आहे.

Exit mobile version