गुळसुंदे येथिल सिद्धेश्वराचे दर्शनासाठी शिव भक्तांची मंदियाळी

| पाताळगंगा | वार्ताहर |

रसायनी परिसरातील गुळसुंदे येथील पाताळगंगा नदी किनारी असलेले प्राचीन दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे मंदिर असुन महाशिवरात्री दिनाच्या निमित्ताने शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाभिषेक, रुद्राभिषेक, स्तोत्रपठण असे कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठया प्रमाणात रेलचेल पहावयास मिळत होती. गुळसुंदे येथिल खेडेगावात असलेले दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर, काळ्या पाषाणातील सुंदर मंदिर असुन हेमाडपंथी दाक्षिणात्य शैलीत पूर्ण चुन्यामध्ये बांधलेले आहे. भव्य घाट, पुढे सभामंडप, दीपमाळ, आंतरभागात शिल्प, चौकटीवर वेलपती कमलाकारांची संकल्प रचना, भिंतीतच समई दिपांसाठी महिरपी कोनाडे, भव्य नंदीशिल्प बाहेरील पायऱ्यांजवळ यादव विजयाची प्रतीकरूप स्त्रीशिल्पे, आहेत.

हे अतिषय प्राचिन मंदिर असल्यामुळे या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरल्यांचे पहाव्यांस मिळत आहे. समोरून वाहणारी पाताळगंगा नदी, मंदिरामध्ये भव्य घाट व पाताळगंगेचा रमणीय परिसर मनाला शांती आणि आनंद देणारे आहे. या ठिकाणी मन प्रसन्न होत असते. आज महा शिवरात्र असल्यामुळे या परिसर भक्तीमय झालेचा पहावयांस मिळत आहे.आज महाशिवरात्र च्या निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

Exit mobile version