। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
बाप्पाच्या स्वागतासाठी खोपोली,कर्जत,मोहपाडा,चौक बाजार पेठ प्लॅस्टीकच्या फुलांनी सजल्या असल्यामुळे अनेक गणेश भक्तांचे लक्ष हा या फुलांकडे अकर्षित होत आहे. यामुळे ही फुले खरेदी करण्यास गणेश भक्त मग्न असलेले चित्र विविध ठिकाणी पहावयास मिळत आहे.
दर वर्षी गणरायाच्या अगमना अगोदर बाजार पेठ फुलांनी बहरुन जात असतो.गणरायासाठी आरास करण्यासाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्यामुळे ही प्लॅस्टिकची फुले विक्रीस ठेवली असल्यामुळे जणू बाजार पेठे रंगीबेरंगी फुलांनी बहरुन गेला आहे.असा भास अनेकांना पडत असतो.यामुळे या फुलांची अनेकांना भुरळ पडतच असते. गणेशभक्त अथवा पर्यटक काही क्षण भर थांबवून ही फुले खरेदी करीत असल्याचे दृश्य सध्या या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
गणरायांच्या अगमनांस एक आठवड्याचाअवधि असता या ठीकाणी मोठ्या प्रमाणात ही फुले विक्रीस येत असतात.गणरायांची आरास करण्यासाठी फुले लागत असतात,मात्र निसर्गात निर्माण झालेली फुले काही वेळाने कोमजून जात असतात.मात्र ही फुले दिर्घकाळ राहत असून मोठ्या संख्येने ही फुले खरेदी करीत आहे.यामध्ये तोरण,माळ,वेळ,हार,फुलांची कुंडी अदि वस्तू विक्रीस ठेवल्या असल्यामुळे दर वर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे फुल विक्रेते यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.