मेरी कोम अडकणार वादाच्या भोवऱ्यात?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने समन्स देखील बजावला आहे. या सर्व घडामोडी महिला कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्यानंतर झाल्या. याच महिला कुस्तीपटूंनी फेब्रुवारी महिन्यात मेरी कोम यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीसमोर देखील आपली व्यथा मांडली होती. मात्र यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही.त्यामुळे त्या सुद्धा या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह काही कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध चौकशी करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन केली होती.

या समितीची अध्यक्ष सहा ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉम करत होती. या समितीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट, तृप्ती मुरगंडे, स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाचे माजी संचालक राधिका श्रीमन, टॉप्सचे माजी प्रमुख कार्यकारी संचालक राजेश राजगोपलन देखील समील होते. महिला कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारी या समितीकडे केल्या होत्या. या समितीतील एकाही व्यक्तीने या तक्रारी खोट्या असल्याचे म्हटले नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या समितीने बृजभूषण यांच्याविरूद्ध कोणतेही आरोप केले नाही. कुस्ती फेडरेशनमध्ये तक्रार निवारण समिती नसल्याचा उल्लेख देखरेख समितीच्या अहवालात होता. मात्र बृजभूषण यांच्याबद्दल काहीही नमुद करण्यात आले नाही. जवळपास एक डझन खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी भाजप खासदाराविरूद्ध वक्तव्य केली होती. या समितीने अहवालात एकप्रकारे बृजभूषण यांना क्लीन चीट दिल्याने कुस्तीपटूंनी जंतर – मंतरवर आंदोलन केल होते.

Exit mobile version