। पेण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते तथा विधी तज्ञ निलेश विठोबा पाटील यांच्या मातोश्री मालती (माई) विठोबा पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले असून त्या अंगणवाडी सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. तसेच पुर्ण पंचक्रोशीत माईबाई म्हणून सुपरिचित होत्या. साधी राहणी व उच्च विचार सरणी हे त्यांचे तत्व होते. व त्या तत्वाच्या जोडीने त्यांनी आपल्या तिनही मुलांना उच्च शिक्षित केले होते. मालती पाटील यांच्यावर अत्यसंस्कार तरणखोप येथील स्मशान भूमीत करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.