। माथेरान। वार्ताहर।
माथेरान शहराला सुविधा पुरविण्याचे काम पाहणार्या माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम, स्वच्छता, आरोग्य, विभाग तसेच कंत्राटी कामगारवर्गाला पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी दि. 21 रोजी दीपावलीच्या पूर्वसंधेला आगळ्यावेगळ्या प्रकारे दीपावलीची भेट देऊन कामगारांसोबत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी कम्युनिटी सेंटर हॉल मध्ये नगरपरीषदेच्या सर्व विभागाच्या कर्मचार्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सुरेखा भणगे यांनी सानुग्राह अनुदान, बोनस तसेच भेटवस्तू देऊन कर्मचार्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी कर्मचार्यांसोबत चर्चासत्र घडवत त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करताना कामगारांनी केलेल्या मागणीनुसार मेडीक्लेम तसेच काही विभागांचा वाढीव पगार, बोनसचा प्रश्न यासारख्या गोष्टींकडे जातीने लक्ष दिले जाईल असे कर्मचारीवर्गाला आश्वासित केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात स्वागत बिरंबोळे, अंकुश इचके, प्रविण सुर्वे, राजेश राजांणे यांनी परिश्रम घेतले होते. याप्रसंगी नरेंद्र सावंत, संदेश कदम सदानंद इंगळे, अनिल नाईकडे, अन्सार महापुळे, विश्वास सातपुते, दिनेश पवार,संजय गोळे तसेच बहुसंख्य कामगार उपस्थित होते.