। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हवेतील प्रदूषण वाढले होते. मात्र, महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानंतर आता प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात आले आहे. मात्र, तरीही मुंबई शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी आणखीन काही कडक उपाययोजना केल्या आहेत.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हवेतील प्रदूषण वाढले होते. मात्र, महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. प्रदूषण पसरवणार्या आणि नियमांचे उल्लंघन करणार्या इमारतींना नोटिसा बजावल्या तर काही इमारतींचे काम रोखले. आता प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात आले आहे. मात्र, तरीही मुंबई शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी आणखीन काही कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 113.18 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.