मुंबई -नागपूर बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत बैठक-दानवे

औरंगाबाद | प्रतिनिधी |
देशातील बहुचर्चित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर लवकरच दिल्लीत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानव यांनी ही माहिती दिली. या बैठकीत बुलेट ट्रेनबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची जास्तीत जास्त जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून याव्यतिरिक्त 38 टक्के जमिनीचं नव्याने अधिग्रहण करणार असल्याची माहितीदेखील रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. प्रकल्पातील पुढील कामांकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. 22 नोव्हेंबर रोजी होणार्‍या बैठकीत या प्रकल्पातील सर्व अडचणी सोडवून कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version