विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

न्हावा-शेवा पोलिसांच्या कार्यक्रमाला 800 विद्यार्थ्यांचा सहभाग

| उरण | वार्ताहर |

बदलापुरातील संतापजनक घटनेनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांमध्येही लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बदलापूर येथील घटनेनंतर न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जेएनपीएच्या कामगार वसाहतील मल्टीपर्पज हॉलमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आरकेएफ स्कूलचा शिक्षकवर्ग व पाचवी ते दहावीचे सुमारे 800 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया येथील एनजीओचे डॉ. किशोर देशमुख, अ‍ॅड.शैलेश कोंडुसकर , अ‍ॅड.विवेक गोपी यांनी यांनी चिल्ड्रन्स अवेअरनेसबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच उपनिरीक्षक लेंडे, महिला पोलीस हवालदार नाईक यांनी सायबर गुन्हे, डायल 112, निर्भया पथक महिला सहाय्य कक्ष व महिलांच्या सुरक्षा संदर्भात माहिती दिली.

Exit mobile version