| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने व खडक पाडा पोलीस ठाण्याने 17 मे रोजी संयुक्त कारवाई केली. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 90 फुटी रोडवरील अटाळी आंबिवली जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ही कारवाई पार पडली. या कारवाईदरम्यान गुलाम मोसन खान उर्फ इराणी (35) यांच्याकडून 29 ग्रॅम वजनाचा मेफोड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या पदार्थाची अंदाजे किंमत 56 हजार रुपये असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.