| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात एका मोटार सायकलची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.
पनवेल येथील म्हाडा कॉलनी मॅरेथॉन बिल्डिंग पळस्पे येथे साहिल चिखले यांनी त्यांची 90 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरून नेली. याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोउपनि किरण राऊत, पोहवा अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, पोना सोमनाथ म्हात्रे, मिथुन भोसले, पोशी शशिकांत काकडे, किरण कराड, मपोशी सुशीला संवार, तेजस्वीनी भागात आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देऊन त्याच्याकडून अवघ्या आठ तासात चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
