| कोलाड | प्रतिनिधी |
पहूर गावातील बाळाराम गंगाराम पवार (70) हे रविवारी (दि.12) सकाळच्या सुमारास काहीही न सांगता घरातून बाहेर पडले होते. दिवसभरात ते पुन्हा घरी न परतल्याने घरच्यांसह गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले. यावेळी रात्री 12 वाजेपर्यंत परिसरात सखोल शोध घेण्यात आला, मात्र हरवलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच, पहूर यांच्या माध्यमातून सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था या संस्थेला माहिती देण्यात आली. या संस्थेने सोमवारी (दि.13) सकाळी 10 वाजता ड्रोनच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. गावापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धरण परिसरात हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कोलाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.





