मिशन साहस-एकता मोहीम यशस्वी

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही सेवांचे (लष्कर, नौदल आणि हवाई दल) प्रतिनिधित्व करणार्‍या बारा महिला अधिकार्‍यांच्या गटाने मुंबई-लक्षद्वीप-मुंबई अशी चार्टर्ड नौकानयन (सेलिंग) मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. 27 दिवसांचे महिलांचे ब्लू वॉटर सेलिंग प्रशिक्षण (ऑल वूमन्स ब्लू वॉटर सेलिंग एक्सपेडिशन) हे सहभागी महिला अधिकार्‍यांच्या धैर्याचा आणि कौशल्याचे अनोखे उदाहरण ठरले आहे. (दि.17) एप्रिल रोजी मुंबई येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते मोहिमेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. तत्पूर्वी, प्रशिक्षण मोहीम आठवी (दि.23) मार्च मार्वे (मुंबई) येथून रवाना झाली आणि 2000 नॉटिकल मैलांचा खडतर प्रवास करून नेव्हल डिटेचमेंट, एंड्रोथ, लक्षद्वीप येथे पोहोचली.

सप्टेंबर 2024 मध्ये होणार्‍या ‘ट्राय-सर्व्हिसेस अराऊंड ऑल वूमन्स ब्लू वॉटर सेलिंग एक्सपेडिशन’ च्या संघांच्या पूर्वतयारीच्या टप्प्याचा एक भाग म्हणून ही मोहीम आखण्यात आली. आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंग आणि आर्मी एक्वा नोडल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीएमईच्या या एकमेव मोहिमेचा उद्देश केवळ सशस्त्र दलातील महिलांच्या अपवादात्मक क्षमतांचे प्रदर्शन करणे नव्हे तर त्यांच्यामध्ये एकता आणि सौहार्दाची प्रगल्भ भावना वाढवणे हा आहे. लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग, इन्स्ट्रॅक्टर यांनी गेल्या 16 महिन्यांपासून आपल्या संघाला प्रशिक्षण दिले. चांगला प्रशिक्षक केवळ चांगले प्रशिक्षण देत नाही. ते जीवन कौशल्य शिकवतात जे आयुष्यभर टिकते. मला विश्‍वास आहे की, आपला संघ वर्षाच्या शेवटी मेगा रनला सुरुवात करेल तेव्हा त्यात आत्मविश्‍वासाने आणि जिंकण्यासाठीच्या ईराद्याने उतरतील. अंतिम मोहिमेसाठी वापरल्या जाणार्‍या त्रिवेणी यॉटमध्ये अधिक प्रशिक्षण घेतल्यास, संघ त्यांचे कौशल्य आणखी वाढवू शकेल,असे सिंग म्हणाले.

नारी शक्तीच्या (महिला सशक्तीकरण) भावनेचे उदाहरण म्हणून सात भारतीय सैन्य अधिकारी, एक भारतीय नौदल अधिकारी आणि चार भारतीय वायुसेनेचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या टीमने भारतीय लष्कराच्या नौकानयन जहाज मनु व्हीआयआरच्या एक्सएस 27 सेलिंग यॉटवर कठोर प्रशिक्षण घेतले. ही मोहीम मार्वे (मुंबई), आयएनएस कदंब (कारवार), आयएनएस कदंब आयएनएस द्विपरक्षक (कावरत्ती), आयएनएस द्वीपरक्षक आयएनएस कदंब, आयएनएस कदंब मार्वे (मुंबई) या चार लेगमध्ये विभागली गेली होती.

ट्राय-सर्व्हिसेस ऑल वुमन ब्लू वॉटर सेलिंग मोहिमेसाठीच्या संघात भारतीय सैन्यदल लेफ्टनंट कर्नल अनुजा, मेजर करमजीत, कॅप्टन ओमिता, कॅप्टन दौली, मेजर भरत, मेजर तान्या, कॅप्टन प्राजक्ता, भारतीय नौदल लेफ्टनंट कमांडर प्रियांका, भारतीय हवाई दल स्क्वार्डन लीडर विभा, स्क्वार्डन लीडर श्रद्धा, स्क्वार्डन लीडर अरुवी, स्क्वार्डन लीडर वैशाली यांचा समावेश होता.

Exit mobile version