मोटारसायकल अपघात; एक ठार, एक जखमी

पनवेल | वार्ताहर |
दोन मोटारसायकलींच्या झालेल्या धडकेत एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना कोन सावळा रोड, सोमटणे पेट्रोल पंपाजवळ, टिसीएल कंपनीच्या गेटसमोरील रस्त्यावर घडली आहे. प्रतीक गोडीवले (25, रा. गुळसुंदे) हे त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवून ओव्हरटेक करीत असताना, समोरून येणार्‍या यामाहा कंपनीच्या मोटारसायकलीस ठोकर मारून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, शेखर गडगे (25, रा. वडगाव) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version