अतिक्रमणाविरोधात अपंग बांधवांचे उपोषण

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने त्याविरोधात अपंग बांधवांनी तीन ऑगस्टपासून पनवेल पालिकेच्या प्रभाग ‘ड’ कार्यालयाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.

अपंग परवानाधारक स्टॉलच्या समोर पनवेल रेल्वे स्टेशनजवळ सात ते आठ अनधिकृत धंदे लावले जात आहेत. महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. परिणामी, हे अतिक्रमण वाढु लागले आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी आणि येथील अनधिकृत धंदे हटवावे व परवाना स्टॉल व इतर अपंग स्टॉलधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते दीपक घाग यांनी केली आहे. यावेळी पालिकेचे अतिक्रमण विभाग हप्ते घेत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप घाग यांनी केला आहे.

Exit mobile version