| मुरूड | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत जंजिरा विद्या मंडळ संचालित सर एस.ए. हायस्कूल व स्व. म.ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय मुरुड जंजिरा यांनी आपले वर्चस्व दाखविले. सुधागड पाली तालुक्यातील नांदगाव हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर एस.ए. हायस्कूलच्या 19 वर्षीय वयोगट मुलांच्या स्पर्धेत तसेच 17 वर्षीय वयोगट मुलींच्या खो-खो स्पर्धेत दोन्ही संघांनी रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले.
या शाळेतील कीडा शिक्षक बालाजी घुणे, महेंद्र घाटवळ, प्राजक्ता आरेकर, निवृत्त क्रीडा शिक्षक पी.के. आरेकर यांनी मेहनत घेऊन यश संपादन केले. या दोन्ही संघांतील खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, उपाध्यक्षा प्रतिभा जोशी, सचिव चंद्रकांत अपराध, संचालक प्रकाश विरकुड, प्रमोद भागदे, अभय दिवेकर, उदय दांडेकर, मुख्याध्यापक सरोज राणे, पर्यवेक्षक भास्कर मोरे, शाळेचे सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.