मुरुड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितिन राऊत, तहसीलदाररोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यामध्ये उसरोली गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, राजपुरी अनु जमाती महिला, वळके सर्वसाधारण खुला, नांदगाव सर्वसाधारण खुला आरक्षण काढण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार रविंद्र सानप, निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी, गटविकास अधिकारी सुभाष वाणी, महसुल सहायक प्रतिक पावसकर, शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, अजित कासार, दिनेश मिणमिणे, माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, विजय पैर, जयंता कासार, शुभांगी करडे, मनोज कमाने, हरी भेकरे, दिपेश वरणकर, मोरे, राहिल कडू, आदिंसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version