| नागपूर | प्रतिनिधी |
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार 38 वर्षीय फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. फहीम खान हा ‘मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी’चा (एमडीपी) नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. फहीम खानच्या भाषणानंतर जमाव भडकला आणि त्यांनी मोठा हिंसाचार घडवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासातून त्याने जहाल भाषण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक होऊन जमावाने काही भागातील घरे आणि वाहने जाळली, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. दरम्यान, फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे 2009, 2022, 2023 या वर्षांत गुन्हे दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता.