। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी कॉलेजच्या सभागृहात बुधवारी (दि.19) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकारांच्या कला सादरीकरणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची असून मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे विकास खारगे तसेच संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनातून निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमाकरिता पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, डायरेक्टर (बेस्ट प्रॉप डील) सचिन पाटील, दिनेश सावंत, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्रशासकीय सल्लागार गाबाजी गिते, कॉलेजचे प्राचार्य ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रविंद्र पाटील, प्राध्यापक निशिकांत कोळसे, मुख्याध्यापक निलेश मगर, होली चाईल्ड मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, प्राध्यापक तेजस म्हात्रे, प्राध्यापक दिनेश पाटील, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.