। चिरनेर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील दादर येथील शिवप्रेमी युवक संघटना नाट्य मंडळाच्यावतीने दि.17 मार्च रोजी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या वसंत कानेटकरांच्या तीन अंकी नाटकाचे सादरीकरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावर करण्यात आले. या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी रुदाली जोशी (सोयराबाई), नूतन पेरवी (येसूबाई), बाळकृष्ण पाटील (शिवाजी महाराज) व संतोष पाटील (संभाजी) या पात्रांनी नाटकात अभिनयाचे रंग भरले. तर, नंदकुमार ठाकूर (हंबीरराव), अजिंक्य पाटील (अण्णाजी), अभिजीत पेरवी (मोरोपंत), जिया पाटील (राजाराम), प्रथमेश पाटील व हितेश पाटील (शिपाई) या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे सादर करून त्यातील बारकावे उत्तम रीतीने दाखविले आहेत.