नखिल जामसंडेकरने केले 100 किल्ले सर

। साखरपा । वृत्तसंस्था ।
पोस्ट खात्यात मल्टि टास्क स्टाफमध्ये काम करत असताना इतिहास विषयाच्या आवडीमुळे सुट्टीच्या दिवसात साखरपामधील युवक निखिल जामसंडेकर याने 100 किल्ल्यांची सफारी केली.
वयाच्या 27 वर्षांपासून किल्ले भ्रमंती करण्यास प्रारंभ केला. रत्नागिरीमधील विजयगड किल्ला पार करत किल्ल्यांची मोहीम पूर्ण झाली. चिखली पोस्ट ऑफिसमध्ये सन 2015 पासून तो खात्यात रुजू झाला. त्यानंतर त्याने या त्याच्या छंदाला प्रारंभ केला. सध्या तो रत्नागिरी मेन ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर यासारखी ट्रेकर लोकांना आव्हानात्मक असणारे किल्लेदेखील निखिलने लीलया पार केले आहेत. त्याचे मित्र अमर रानभरे, संकेत साळवी, भाई गांधी, विशाल कनवजे, शशांक वाघधरे, प्रज्योत पाताडे, सचिन चव्हाण, तृषांत चव्हाण आदींनी त्याला याकामी मदत केल्याचे सांगितले. शरीरात जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त किल्ले पार करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्याने सांगितले.100 किल्ल्यांवर न थांबता राज्यात जेवढे किल्ले आहेत, तेवढे आपण पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.

Exit mobile version