। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथील लोकविकास सामाजिक संस्थेकडून साखरचौथ गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 150 महिलांनी सहभाग घेत मोदकाचे विविध प्रकार सादर केले होते. या मधून दर्शना नितीन नरवणकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ही स्पर्धा विरेश्वर महाराज सभागृहात शनिवारी (दि.21) घेण्यात आली होती.
गेली 9 वर्षे साखरचौथ गणपती उत्सवादरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी महिला वर्गासाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी महाड मधील सुमारे 150 महिलांनी स्पर्धेत भाग घेत मोदकाचे विविध प्रकार सादर केले. महिलांनी सादर केलेल्या मोदकांचे परीक्षण मेधा भुस्कुटे व आश्विनि यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक दर्शना नरवणकर, व्दितीय क्रमांक राखी साळुंखे, तृतीय क्रमांक समिक्षा टाकळे तर उत्तेजनार्थ मोनिका फंड, शितल गादे, कल्पना खैरकर, शितल गांधी, अक्षता अवसरे, प्रणाली वनारसे, नमिता मालुसरे आदींची निवड करत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.