प्रकाश गायकवाड यांना राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्कार

। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांना राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. फुले,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचे भावी राष्ट्र निर्माण करण्यात गायकवाड यांचे योगदान हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी सम्यक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य,शिक्षण तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिल्याने त्यांना राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. तरजयेश जाधव यांना आदर्श पत्रकार कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सुखदेव भालेराव, जयेंद्र खुणे, विक्रम सेन आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version