। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
भारत देश हा कृषिप्रधान देश असून विविध संस्कृतीने नटलेला आहे. त्याचे संरक्षण हे आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार आवश्यक आहे. कोकणात विविध रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात आणि ग्रामीण कुटुंब त्याचे पुरेपूर सेवन करतांना आढळतात. याबद्दल विशेष जनजागृती करणे तसेच भरड धान्य आणि कडधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी अदानी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. यावेळी राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम वडवली येथील आगरी भंडारी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला होतो.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रमुख अधिकारी अमिता भायदे, प्रशासक भरत कुबेर, अदानी फाउंडेशन डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.