। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरु झालेले आहे. त्यामुळे पक्षात नेमके काय सुरु आहे, याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तालुकाध्यक्ष भगवान चंचे यांच्यासह महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे यांनी देखील राजीनामा दिला आहे.
धुळे यांनी पदाचा राजीनामा जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंढे त्यांच्याकडे पाठवून दिला होता. त्या राजीनामा पत्रावर जिल्हा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. चंचे यांनी तानाजी चव्हाण, शरद लाड यांच्यावर थेट आरोप केले आहेत.