मोहोपाड्यात रंगली राष्ट्रवादीची मंगळागौर

| रसायनी | वार्ताहर |

राष्ट्रवादी महिला आघाडी खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्यावतीने श्रावणसरी मंगळागौर स्पर्धा मोहोपाडा येथील जनता विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, उमा मुंढे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्धेंत एकोणतीस गट़ांनी भाग घेतला होता. भाग घेणाऱ्या गटातील प्रत्येक महिलेला सहभागासाठी भेटवस्तू देण्यात आली. यावेळी महिलांनी या मंगळागौर खेळात सहभागी होवून गाणी म्हणत खेळ खेळत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत पंचवीस गरोदर महिलांनी उपस्थित राहून रॅमवॉक केले. या गरोदर महिलांना मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सकस आहाराचे पॅकेज वाटप करण्यात आले. खेळ पाहण्यासाठी जमलेली महिलांची गर्दी लक्षणीय होती. यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दहा हजार रोख व सन्मानचिन्ह नारायणी ग्रुप खोपोली यांनी पटकाविले तर व्दितीय क्रमांक रोख सात हजार व सन्मानचिन्ह अंबे स्मृती ग्रुप नवीन रिस, तृतीय क्रमांक रोख पाच हजार व सन्मानचिन्ह सखी ग्रुप कांबे यांनी पटकावला. विजेत्यांना कॅबिनेट राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक सखी मंगळागौर ग्रुप काळणाचीवाडी, गावदेवी चामुंडा माता ग्रुप शेडवली यांनी पटकाविले. तर पैठणीच्या लकी ड्रॉ विजेत्या रजनी विनायक गायकवाड यांनी जिंकली. यावेळी वर्षा पाटील, रेश्मा चौधरी, शिल्पा सुर्वे, सुप्रिया तटकरे, पद्माताई पाटील, दिव्या जांभले , राजश्री जांभळे, प्रमिला मु़ंढे, वर्षा शिंदे, विनया मुंढे, वृशाली म्हात्रे, प्राची पाटील, प्रमिला दळवी, शारदा काळे, मनाली शिंदे, सतिक्षा पाटील, सारिका कांबळे, जोश्त्ना खाने, सोनाली गोपाळे, एकता कांबळे, वैशाली जाधव, अंजू सरकार, ज्योती पाटील आदीसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच ग्रामसूधार मंडळाचे अध्यक्ष पदमाकर मते, उपाध्यक्ष सुदाम मु़ंढे ही उपस्थित होते. या कार्यंक्रमात महिलांचा आनंद ओसंडून आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमाताई मुंढे, माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सूत्रसंचलन संतोष चौधरी यांनी केले.

Exit mobile version