| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पुगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नीलम कळमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतमधील पदावर कार्यरत असलेले उपसरपंच राम धुपकर यांनी आपल्या ठराविक ठरलेल्या कार्यकाळप्रमाणे व दिलेल्या वचनाप्रमाणे या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झालेल्या उपसरपंचपदी कार्यरत असलेल्या सदस्या नीलम कळमकर यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी व माजी उपसरपंच राम धुपकर, अदिती झोलगे, रचना कळमकर, गणेश म्हसकर, ग्रामसेवक गोविंद शिद, अनंत म्हसकर उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलम कलमकर बिनविरोध
