कामोठेत स्वच्छ पनवेल अभियानाला हरताळ

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; शेकाप आक्रमक

| पनवेल | प्रतिनिधी |

कामोठे शहरात आठवड्यातून एकदा कचरा उचलण्यासाठी गाडी येते. आठ-आठ दिवस कचरा उचलला जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यातच ओल्या कचऱ्याचे पाणी रस्त्यावर ठिकठिकाणी गळत असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. दरम्यान, शेकापने याविरोधात आवाज उठविला असून, तात्काळ उपाययोजना करण्यात मागणी महापालिकेकडे केली आहे.

याविषयी शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे महिला कार्याध्यक्षा शुभांगी खरात यांनी पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यातून पालिकेने ब्लिचिंग पावडर टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खरे तर, या दुर्गंधीमधून नागरिकांना कायमची सुटका कधी मिळणार याची नागरिक वाट पाहात आहे. फक्त ज्या विभागात पनवेलमधील नेते राहतात, हाच भाग स्वच्छ आणि सुंदर पनवेल अभियानांतर्गत येतो का, असा सवाल नागरिक करीत आहेत.

कचरा गाडी आली की कचऱ्याचे पाणी बाहेर पडते, इमारतीच्या गेटवर पाणी साचत असल्याने त्यातून रहिवाशांना सकाळी कामावर जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. तीव्र दुर्गंधी असल्याने डोकेदुखीच्या तक्रारी येत आहेत, या समस्येकडेही लक्ष वेधले आहे.

Exit mobile version