न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

इंग्लंडवर 5 विकेटने केली मात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दुबईत सुरु असलेल्या आयसीसी टी20 विश्‍वचषक स्पर्धेत पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर पाच विकेट्सने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. डेरिल मिचेलच्या झुंजार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या होणार्‍या दुसर्‍या सेमी फायनलमधील विजेत्याशी त्यांची अंतिम लढत होणार आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या जोस बटलर आणि बेअरस्टोने इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागिदारी केली. पण, पाचव्या षटकात न्यूझीलंडच्या मिल्नेने इंग्लंडला पहिला धक्का दिला. बटलर 13 धावांवर बाद झाला. यानंतर जोस बटलरही 29 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण, यानंतर डेव्हिड मलान आणि मोईन अलीने फटकेबाजी करत इंग्लंडला चांगली धावसंख्या उभारुन दिली. मोईन अली (नाबाद 52) आणि डेविड मलान (42) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 166 धावांपर्यंत मजल मारली.
दरम्यान, विजयाचे 166 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सने सलामीच्या मार्टिन गुप्टीलला पॅव्हिलेअनिचा रस्ता दाखवला. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला केन विल्यमसनही अवघ्या 5 धावा करुन बाद झाला. पण, डेरिल मिचेलन मैदानावर तळ ठोकत एकाकी झुंज दिली. षटकार आणि चौकारांची बरसात करत न्यूझीलंडला दमदार विजय मिळवून दिला. मिचेलने 72 धावांची नाबाद विजय खेळी केली. अवघ्या 47 बॉलमध्ये मिचेलने 4 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशमने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Exit mobile version