| पुणे | वृत्तसंस्था |
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 24 ते 29 सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, उपगनर आणि ठाणे परिसरात जोराचा पाऊस पडेल. पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल. नागपूरमध्ये 24 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात 24 सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.