डेल्टा प्लसबाबत चिंतेचं कारण नाही : राजेश टोपे

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा आजवर मर्यादित संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तसेच या व्हेरियंटबाबत ठोस अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही, केवळ याबाबत तर्कवितर्कच लढवले जात आहेत. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत जास्त चिंता करण्याचं कारण नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना टोपे म्हणाले, आरोग्य विभागाला अनेक लोक सहकार्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे मी अशांना मुद्दाम आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्यासमोर अधिकाधिक टेस्टिंग आणि लसीकरणाचं आव्हानं आहे. पण, कोव्हिडच्या नियमांचं सर्वांनी कसोशीन पालनं करणं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं आहे. सर्व जिल्ह्यांना आपण आता तिसर्‍या टप्प्यात आणलं आहे. त्यांमुळे सर्वांना या टप्पातील निर्बंध लागू आहेत, आता सर्वांनी हे निर्बंध पाळले पाहिजेत. यासाठी प्रशासनानेही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Exit mobile version