। कोर्लई-आगारदंडा । प्रतिनिधी ।
मे महिन्यात उन्हाच्या काहिली नंतर पहिल्या आठवड्यात हवामानात बदल होऊन मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे मुरुडमध्ये नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. आतापर्यंत 12 मि.मी.पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील फळभाजी, आंबा व काजू पीकांवर परिणाम झाला आहे. यंदा थंडीमुळे आंब्याला चांगला मोहर येऊन आंबा चांगला तयार झाला होता. तर, काही ठिकाणी झाडावर उशीरा मोहर आल्याने पीकही उशीरा आल्याने बागायतदार शेतकर्यांनी आंबा आजुनपर्यंत उतरवला नव्हता. त्यात अचानक अवकाळी पाऊसासह जोरदार वार्यामुळे तयार झालेला आंबा खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, माडावरचे छोटे नारळ व झावळ्या पडुन रस्तावर विखुरले होते. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर, काही ठिकाणी कच्च्या वीटा भिजून वीटभट्टी व्यवसाावर परिणाम झाला आहे.