| नाशिक | प्रतिनिधी |
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील मायक्रोबायोलॉजी-1 या विषयाची लेखी परीक्षा पुन्हा होणार आहे. यापूर्वी शुक्रवारी (ता.11) झालेला या विषयाचा पेपर रद्दबातल ठरविला असून, आता तो 26 मार्चला पुन्हा घेतला जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी आदेश जारी केले आहेत.द्वितीय वर्ष एमबीबीएस (2019) या अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजी-1 या विषयाची लेखी परीक्षा 11 मार्चला दुपारच्या सत्रात राज्यातील 41 परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी रद्दबातल करण्यात आली आहे.