उरण ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळती

। उरण । वार्ताहर ।

उरण महावितरण कार्यालयाच्या दुर्लक्षितेमुळे शहराला विद्युत पुरवठा करणार्‍या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळतीची घटना गुरुवारी (दि.19) घडली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी, महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांनी विजेची समस्या दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मागील पाच, सहा महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच शेकापक्षाचे युवक तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी 22 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

Exit mobile version