रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

| रसायनी । वार्ताहर ।

तुराडे गावाजवळ शनिवारी रात्री रेल्वे अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. अंकित रमेश राठोड (17, रा. वावेघर, पनवेल) असे त्याने नाव असून याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पनवेलकडे जाणार्‍या रेल्वे गाडीने, ठोकर दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत सचिन पवार यांनी रसायनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी काळे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version