रायगड जिल्ह्यात 74 कर्मचाऱ्यांची भर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महावितरण कंपनीचे जाळे ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी वाढले आहे. अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सेवा देताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, नुकतीच महावितरण कंपनीकडून विद्यूत सहाय्यक पदाची भरती करण्यात आली. प्रतिक्षा यादीवर निवड झालेल्या एक हजार 47 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक महावितरण कंपनीच्या विभागात दाखल झाले आहेत. त्यात रायगड जिल्ह्यात 74 कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.
रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात खेड्या पाड्यात, गावे, वाड्या वस्त्यांसह शहरी भागात ठिकठिकाणी महावितरण कंपनीने त्यांचे विजेचे जाळे पसरविले आहे. मागेल त्याला वीज या भुमिकेतून नियमांची पुर्तता झालेल्या नागरिकांना नवीन वीज कनेक्शन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील भाग विज पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. घरगूती विजय कनेक्शनसह व्यावसायिक, औद्योगिक कामांसाठी विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. वाढत्या मागणीसह वापरामुळे महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा कायमच भेडसावत राहिला आहे. पुर्ण वेळ कर्मचाऱ्यांचा अभाव अनेकवेळा महावितरण कंपनीला दिसून आला आहे. महावितरण कंपनीने नुकतीच विद्यूत सहाय्यक या पदाची भरती काढली. या भरतीची परीक्षा मागील काही महिन्यांपुर्वी झाली. यातील काहीजण प्रतिक्षा यादीवर होते. अखेर या प्रतिक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांची विदयूत सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नगरपरिषद निवडणुकींसह महानगर पालिका व जिल्हा परिषद निवडणूकांमुळे नियुक्ती करता येत नव्हती. या निवडणुकांची आडकाठी नियुक्तीवर झाली होती. अखेर जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावर प्रतिक्षा यादीवर निवड झालेल्या एक हजार 847 उमेदवारांची विद्यूत सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील 74 उमेदवारांचा समावेश आहे. विद्यूत सहाय्यक म्हणून पुणे, बारामती, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगांव, कल्याण व नाशिक आदी जिल्ह्यातील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक झाल्यावर ते सर्व उमेदवार कामावर रुजू झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच कागदपत्रांची पडताळणीदेखील झाल्याची माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीवर असलेल्या राज्यातील विद्यूत सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हयातील 74 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आचारसंहिता संपल्यावर तातडीने या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-धनराज बिक्कड
कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी







