| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूका उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका शुक्रवारी अचानक पुढे ढकलल्या होत्या. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. आणि सिनेटच्या निवडणुकीच्या स्थगितीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. अखेर न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला या निर्णयाविरोधात फटकारले असून, सिनेटच्या निवडणुका या उद्याच घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. या निकालाने शिंदे सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता यांनी बाजू मांडली.