कोप्रोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोप्रोलीत रक्तदान शिबिर आयोज करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन निर्भय म्हात्रे, युनियन बँकेच्या व्यवस्थापिका श्रीमती नीलम यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्याने रक्तदान केले. कार्यक्रमाचे निवेदन जीवन डाकी, हेमाली म्हात्रे, रनिता ठाकूर यांनी केले. राकेश पाटील यांनी आभार मानले.या शिबिराला ज्ञानेश्‍वर घरत, रवी भोईर, नीलकंठ घरत, रोशन पाटील, प्रसाद पाटील, नागेंद्र म्हात्रे उपस्थित होते. शिबीर यशस्वी होण्यासोठी डॉ. हिराचंद पाटील, सुनील वर्तक, निवास गावंड, राकेश पाटील कोप्रोली कॉम्प्युटर सेंटरमधील सर्व टीमने याने मेहनत घेतली.

Exit mobile version