| अलिबाग| विशेष प्रतनिधी|
महात्मा गांधी तंटामुक्त समिती ग्राम पंचायत पेढांबे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. राजिप शाळा पेढांबे येथे या स्पर्धा घेण्यात आली.

तत्पूर्वी शिवपुतळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून श्री देवेंद्र म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस सर तसेच उद्योजक, श्री भोईर पेण शहर अध्यक्ष कांग्रेस, श्री सदानंद थळे सर मुख्याध्यापक रा.जि.प. शाळा पेढांबे, श्रीमती जिविता पाटील साहित्यिक समाज सेविका, तसेच राखी पाटील सह. सचिव तेजस्विता फाँऊंडेशन, श्री रूपेश पाटील म. गांधी तरामुक्त समिती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य श्री अविनाश आचरेकर, श्री अनिल पाटील, श्री अजित पाटील समिर केळस्कर, श्रुती बैकर, ज्योती पाटणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. एकूण ३२ स्पर्धकांनी भाग घेतला व मान्यवर परिक्षक म्हणून साहित्यिक को.म.स.पा चे केंद्रीय सदस्य श्री दिलिप पाटील व श्री नरेंद्र पसिल सर यांनी काम पाहीले. तर सुत्र संचालन सौ. सुलभा डोबरे मॅडम व आभार जैनब कुरैशीने आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.