| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
देशपांडे चेस अकॅडमी व रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत (25) सप्टेंबर रोजी गोरेगाव, प्रथमच 13 वर्षाखालील वयोगटात रायगड जिल्हा संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होऊन त्यानंतर स्पर्धा सुरू होतील.
या स्पर्धेत 13 वर्षाखालील वयोगटात जिल्ह्यातून दोन मुलांची व दोन मुलींची जिल्हा संघ म्हणून निवड होऊन त्यांना नागपूर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. गोरेगावमध्ये होणारी ही स्पर्धा खुला गट 17 वर्षाखालील वयोगट व 13 वर्षाखालील वयोगटात खेळवली जाणार आहे. स्पर्धा प्रवेशिका 23 तारखेला रात्री नंतर स्वीकारल्या जाणार नाहीत. सदर स्पर्धेत भाग घेण्याकरिता विलास म्हात्रे, अलिबाग- रायगड, 8888011411 किशोर देशपांडे, 8888250234 यांच्याजवळ आपल्या नावाची नोंद करू शकता.जास्तीत जास्त संख्येने या बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे व देशपांडे चेस कॅडमीचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी केले आहे.
बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Businessman suit with chess board game. Plan stratgy and tactic concept