। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील क्रिकेट पंच व क्रिकेट प्रेमींसाठी माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग यांच्या पुढाकाराने व रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने गुरुवारी (दि.13) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अलिबाग येथे क्रिकेट नियमांचा एक दिवसाच्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादात क्रिकेटचे नियम शिकवले जाणार असून उपस्थित लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली जाणार आहेत. परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षद रावले (बीसीसीआय पंच व माजी रणजीपट्टू), राजन कसबे (पंच एमसीए, मुंबई), नयन कट्टा (एमसीसी लॉ अभ्यासक व मार्गदर्शक) हे उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणीची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे. तसेच, उपस्थित क्रिकेटपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.