। उरण । वार्ताहर ।
लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23) सकाळी 10 ते 3.30 वाजता रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी https://bit.ly/pirkonjobfairšregistration या लिंकद्वारे नाव नोंदणी करावी. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवार्याच्या नोंदणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी एस.जी. चव्हाण 9372413342, प्रमोद गजहंस 9372603865, बाळकृष्ण म्हात्रे 9324725532, समाधान जावळे 9324725524, संदीप म्हात्रे 9821142202, अविनाश म्हात्रे व मित्र परिवारचे प्रमुख अविनाश म्हात्रे 9004709244 यांच्याशी संपर्क साधावा.