| अलिबाग | प्रतिनिधी |
कालनिर्णयतर्फे वाचकांसाठी पाकनिर्णय-2026 ही पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, तसेच ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंका’चा प्रकाशन समारंभ आणि ‘आठवणीतील गाणी’ या सुरेल मैफलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता यशवंत नाट्यमंदिर, 122 – डी, जे. के. सावंतमार्ग, जोशीवाडी, माटुंगा (प.), मुंबई येथे पार पडणार आहे.
या सोहळ्याला पाककला स्पर्धेचे परीक्षक मोहसिना मुकादम, शेफ अनिश देशमुख आणि आशालता पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तसेच या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक आणि कवी डॉ. नीतीन रिंढे उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कालनिर्णयचे संपादक, प्रकाशक जयराज साळगावकर यांनी केले आहे.





