अलिबाग । वार्ताहर ।
1 मे रोजी अलिबाग तालुक्यातील राममंदिर येथे छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य आयोजित विविध स्पर्धा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत पंचक्रोशीतून 30 छोट्या मावळ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन राजेश मोकल व प्राजक्ता प्रविण थळे यांनी केले. स्पर्धेमध्ये निबंध लेखन, वक्तृत्व, पोवाडा गायन, भक्तीगीत, शिवकला असे अनेक स्पर्धेक सहभागी झाले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी मावळ्यास गौरवपत्र, ट्रॉफी व मेडल देवून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या मौलिक भाषणाने व मावळ्यांच्या सर्वोत्कृष्ट कौशल्याने महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमासाठी रोशन पवार, स्वप्नील घरत, महेश घरत, किरण भगत, धनंजय मोकल, उल्हास गावंड,घनश्याम पाटील, श्रीकृष्ण पाटील, रसिका तुरे, दिनेश टोपले उपस्थित होते.